वेड्या मनाला
वेड्या मनाला
वेड्या मनाला वेडा
दिलासा आहे
तुझं प्रेम माझी वेडी
आशा आहे || 0 ||
तुलाच शोधत असतो मी
इथे तिथे सर्वत्र
मनात माझ्या रंगलंय
फक्त तुझंच चित्र
मला फक्त तुझी
अभिलाषा आहे
तुझं प्रेम माझी वेडी
आशा आहे || 1 ||
तूच माझ्या काव्य आहेस
तूच माझं साहित्य
तूच तूच असतेस सखे
माझ्या मनात नित्य
तूच माझ्या मनाची
भाषा आहे
तुझं प्रेम माझी वेडी
आशा आहे || 2 ||