STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

वेडी झाली दुनिया..

वेडी झाली दुनिया..

1 min
241

रंग गोरापान लागलीस परी तू दिसायला

अन् वेडी झाली दुनिया तुझ्या पाहून रुपाला.


नाकी डोळी छान तुझं सुंदर किती रुप

झालो फिदा तुझ्यावर येईना मज झोप.

तुझ्या रुपाची जादू राणी लागलं वेड मला...


ओठ लाल , गुलाबी गाल भिरभिरती केस

खजिना सौंदर्याचा तुझी जवानी मदहोश

नाही जोड तुझ्या ग मुळी या सुंदर रुपाला....


पाहून तुला होतो वेडा, आनंद केवढा मनामध्ये

नजरेत तुझ्या नशा न्यारी नी गोडी तुझ्या शब्दांमध्ये

जवळ हवीस तू सदा माझ्या ग चैन पडेना जीवाला...


जादू तुझ्या रुपाची भारी भुरळ घालते नजर

स्मीत हसतेस गावांमध्ये खळी सुंदर गालावर

पाहून भरेना मन हे मुळीच वाटे मिठीत घ्यावे तुला...


विना साजश्रंगार तू सुंदर केवढी सुंदर काया ग

तुला पाहून कित्येक मजनू गेले खरंच वाया ग

तुझ्या साठीच मला देवानं जन्म राणी हा दिला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance