STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

वाटल तर उघड

वाटल तर उघड

1 min
202

वाटलं तर उघड

दार तुझ्या मनाच

जन्मभर वाट बघत

मी बाहेर उभा आहे...

वाटलं तर सजव

अंगण तुझ्या मनाचं

सुखाचे रंग घेऊन

मी हाती उभा आहे...

वाटल तर टेकव

कधी डोकं माझ्या खांद्यावर

तुझ्या अश्रूंसाठी

या पापण्या माझ्या आहे...

वाटलं तर बघ

माझा हात हाती घेऊन

तुझ्या स्वप्नांसाठी

सखे पंख माझे आहे...

वाटलं तर उघड

दार तुझ्या मनाचं

जन्मभर सखे

मी बाहेर उभा आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance