वाटचाल गूलामीकडे...
वाटचाल गूलामीकडे...
निवडून दिले तुला, झाला खरा हाच गुन्हा
पोरा तुझी माय आता, झाली रे गुलाम पुन्हा ।।धृ।।
विकासाच्या नावाने तू रोज भूकशील
हळू हळू संपत्ती ही रोज विकशील
सरकारी आभूषणे... झाली रे निलाम पुन्हा
पोरा तुझी माय आता, झाली रे गुलाम पुन्हा ।।१।।
कृषी कायदयाने इथे पेटवलं ते रान
महागाईचं गुपीत आहे यात तु जान
सरकारी दारं आता... झाली रे जाम पुन्हा
पोरा तुझी माय आता, झाली रे गुलाम पुन्हा ।।२।।
चोर सोडून संन्याशाला फाशी देतील
विरोध केला इथं देशद्रोही होशील
हुकूमशाहीने इथे... दाबला आवाज पुन्हा
पोरा तुझी माय आता, झाली रे गुलाम पुन्हा ।।३।।
योग्या म्हणे देशहित वाचवायाला
चला एकजूट करू भारताला या
ईव्हीएमला इथं... लावू या लगाम पुन्हा
पोरा तुझी माय आता, झाली रे गुलाम पुन्हा ।।४।।
