STORYMIRROR

Yogesh Panpatil

Inspirational

3  

Yogesh Panpatil

Inspirational

मोकळा श्वास

मोकळा श्वास

1 min
273

कुणी जाणूनबुजून घडवतं

तर कधी अघटित सारं घडतं

असं नेहमीच आता

माझ्या कानावर येऊन पडतं

घुसमट होतेय काळजात

बदलण्याची आहे आस

तुमच्या नीच राजकारणामधून

घेऊ द्या जरा मोकळा श्वास !! १ !!


जीवनावश्यक वस्तूंचाही

तुम्ही साठेबाजार मांडला 

मीठ मसाला लावून मिडीयाने 

गरीब ऊखळीमध्ये कांडला

गुदमरतो आहे रोजच इथे 

मरणयातनेचा होतोय भास

तुमच्या नीच राजकारणामधून

घेऊ द्या जरा मोकळा श्वास !! २ !!


दिल्लीच्या त्या दरबारामध्ये

शेतकरी माझा ओरडून सांगतो

साठेबाजीच्या कायद्याविरूध्द

जनसामान्यांसाठी न्याय मागतो

आता कुठंशी येतो आहे 

तुम्हा सरकारी धोरणांचा वास

तुमच्या नीच राजकारणामधून

घेऊ द्या जरा मोकळा श्वास !! ३ !!


कुणी इथं फक्त झेंडे गाडले

तर कुणी मदतीला धावले

संकटाच्या काळात खरे

तळागाळातले लोक पावले

स्वार्थाचे राजकारण सोडून 

समाजसेवेचा घ्यावा ध्यास

तुमच्या नीच राजकारणामधून

घेऊ द्या जरा मोकळा श्वास !! ४ !!


एक खड्डा करून तुम्ही 

प्रसिद्धीसाठी फोटो काढले 

आता प्राणवायूच्या तुटवड्यापायी

मृत्यू दराचे प्रमाण वाढले 

म्हणून योग्याच्याही लेखणीने 

जनजागृतीची धरावी कास

अन् तुमच्या नीच राजकारणामधून

घेऊ द्या आम्हाला मोकळा श्वास !! ५ !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational