रणसंग्राम...
रणसंग्राम...
असावं लिखाण, येऊन उधाण
काळजात ठसवावं...
कवी तू राजा, जागवून प्रजा
रणसंग्राम पेटवावं... !! धृ !!
ख-या खोट्याची जाणून गती
दूश्मनाची पाहून नीती
करून कोंडी, उचलून धोंडी
खिंडीत गाठवावं...
कवी तू राजा, जागवून प्रजा
रणसंग्राम पेटवावं... !! १ !!
सत्ता चालाया असता रांडव
नको नको ते करीतो तांडव
टोचून वेसन, पाडाया आसन
वेळीच उठावावं...
कवी तू राजा, जागवून प्रजा
रणसंग्राम पेटवावं... !! २ !!
नको पाहू उमेदवाराच्या जाती
इमानदारीत त्याच्या असावी माती
बूथवर जाऊन,शाई ती लावून
शिक्का तु वठवावं...
कवी तू राजा, जागवून प्रजा
रणसंग्राम पेटवावं... !! ३ !!
महापुरूषांची वाचावी गाथा
त्यांच्या चरणी टेकुनी माथा
योग्या तु जागून, मत्सर त्यागून
विचार आठवावं...
कवी तू राजा, जागवून प्रजा
रणसंग्राम पेटवावं... !! ४ !!
