STORYMIRROR

Raakesh More

Romance Inspirational

3  

Raakesh More

Romance Inspirational

वाच डोळ्यातले भाव

वाच डोळ्यातले भाव

1 min
102

वाचायचं आहे तर वाच 

माझ्या डोळ्यातले भाव 

बघायचे असतील तर बघ

माझ्या हृदयाचे घाव || 0 ||


खूप झालं वाचन तुझं 

थिअरीवर आधारलेलं 

कधीतरी अनुभव तू 

खरं स्वप्न साकारलेलं 

करायचा असेल तर कर 

कमी प्रेमाला मज्जाव 

बघायचे असतील तर बघ

माझ्या हृदयाचे घाव || 1 ||


पट माझ्या हृदयाला 

कर तू बिनधास्त 

तू जे करशील ते 

सारं असेल रास्त 

खेळायचा असेल तर खेळून 

बघ प्रेमाचा डाव 

बघायचे असतील तर बघ

माझ्या हृदयाचे घाव || 2 ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance