*उंच माझा झोका*
*उंच माझा झोका*
उंच माझा झोका जाई
माझ्या आठवणी *राही,*
मनी प्रेम सारे तुझे
सदा काळजात *राही.*
सोसुनिया हाल जीवा
क्षण प्रितीचे *फुलले,*
तुझ्या माझ्या संसाराचे
फुल वेलीवर *झुले.*
प्रितीलाही ना कळे
भाव बंधनाचे *मर्म,*
किती आठवणी छान
तरी काळजात *वर्म.*
जीवनात साथ तुझी
वाटे तुझाच *आधार,*
तुझ्यासवे घेई झोका
जाई उंच फार *फार.*
तुला हृदयात ठेवावे
सदा सन्मान *देऊन,*
तुझ कौतुक करावं
सखे आनंद *भरून.*