STORYMIRROR

Datta Joshi

Comedy

3  

Datta Joshi

Comedy

उनाड वारा

उनाड वारा

1 min
1.5K

माझ्या गच्चीतून

तुझी गच्ची मस्तच दिसते

जेंव्हा तू तिथे केस झटकत

उन्हामध्ये उभी असते

पायांमध्ये जरी आले गोळे

न हलवता पापण्यांना

मी पाहतो एकटक तुझे

केस भुरभुरणारे कुरळे कुरळे

हसलीस तू गालात

असे मला वाटले

चहा संपला तरी कपाला मी

किती वेळा चाटले

आला वारा सोसाट्याचा

उडाले माझे कपडे वाळत घातलेले

जावून पडले गच्चीत तुझ्या

डोळे माझे राहिले विस्फारलेले

मागावसास गेलो तुझ्या घरी

दार उघडले तुझ्या भावाने

माझे कपडे दया, म्हणता हलकटाने

उत्तर दिले हाताने आणि पायाने

काय करता, सगळे संपले

कपडे उडवले, स्वप्नही तुडवले

कारण नसता बडवले

या उनाड वाऱ्याने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy