STORYMIRROR

Archana Murugkar

Inspirational

4  

Archana Murugkar

Inspirational

उमलू द्या ही अशीच कळी

उमलू द्या ही अशीच कळी

1 min
416

रसरशीत, टपोरी कळी

उमंग मनी, अंगी नव्हाळी

मनात स्वप्ने, उरात आशा

उमलू द्या ही अशीच कळी


चाले लगबग तिची सारी

उमलण्याची सकाळी

जगाला नव्या पाहण्याची

सुंदर उत्साही सोनसळी


नको घाई तोडण्याची

फुलू द्यावे झाडावर

जसे बाळ प्रेमे वाढते

माऊलीच्या मांडीवर


मोहक रूप आकार तिचा

असे तिच्या मालकीचा

जगू द्यावे मनाजोगे

पसरण्या दरवळ कर्तृत्वाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational