STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणींवर आधारित काव्यरचना

उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणींवर आधारित काव्यरचना

1 min
441

शब्दांचा स्वाद आधी

हवा सर्वांनी चाखायाला

नाही तर *उचलली जीभ*

*अन् लावली टाळ्याला*

    शब्दातील हीन भावना

    एखाद्याला मारते

     शब्दातील चैतन्यच

    संकटातूनही तारते

वापरावी जपून जीवनी

निरर्थक अपुली भाषा

जाणून घ्यावी आपणही

उपदेशात्मक परिभाषा

     उत्साहाचे शब्द उधळूनी

     नैराश्येला द्यावी दिशा

    विचारपूर्वक सल्ला-मसलतीने

    उषःकाली उजळावी निशा

मत मांडतांना अपुले

करावा सर्व बाजूने विचार

यावी विचारांची मांदियाळी

व्हावा सुखी अपुला आचार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy