तूच खरी नारी....
तूच खरी नारी....
तूच खरी नारी...
जीणे पतीशी एकनिष्ठ राहून
माहेराशी संबंध तोडले...
नात्यांना..भावनांना बाजूला सारुन...
आल्या प्रसंगाला ध्यैर्याने खंबीरपणे..
सामोरे जात 'स्वराज्य ऊभारले...
तूच खरी नारी...
जिणे आशिया खंडात मुलींची शाळा सुरु केली
स्त्री व शुद्रामधे शिक्षणाचा प्रसार करुन
काव्यलेखन,बावनकशी काव्य रचली
सत्यशोधक समाज उभारुन
प्लेग रोग्याची सेवा केली...
तूच खरी नारी
जीणे भुकेल्या मुलांची दशा पाहुनी
सोन्याच्या बांगड्या दिल्या काढुनी..
नसती त्यागमूर्ती रमाई..
तर नसते मिळाले या देशाला विश्वरत्न...