STORYMIRROR

Dipaali Pralhad

Romance Others

4  

Dipaali Pralhad

Romance Others

तू सोबत असतांना ..............

तू सोबत असतांना ..............

1 min
334

तू सोबत असतांना 

आयुष्य सुंदर वाटतं ,

इंद्रधनूच्या सप्तरंगात 

न्हाऊन निघतं ,


तू सोबत असतांना 

आयुष्य सुंदर वाटतं ,

ग्रीष्माच्या प्रखर उन्हातही 

रात्रीच्या चांदण्यांचं सुख लागतं 


तू सोबत असतांना 

आयुष्य सुंदर वाटतं ,

नव्या कोऱ्या वहीत अलगद 

जपुन ठेवलेलं पान वाटतं 


तू सोबत असतांना 

आयुष्य सुंदर वाटतं ,

बेधुंद मनाच्या लहरीत 

तरंगणारं फुलपाखरूं वाटतं 


तू सोबत असतांना 

आयुष्य सुंदर वाटतं ,

बेभान सळसळता वारा वाटतं,

मनाचं मोकळं रान वाटतं,


तू सोबत असतांना 

आयुष्य सुंदर वाटतं ,

पहाटेच्या साखरझोपेतलं स्वप्न वाटतं,

तू सोबत असतांना 

आयुष्य खरचं सुंदर वाटतं .



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance