STORYMIRROR

Deepali Mathane

Romance Tragedy

3  

Deepali Mathane

Romance Tragedy

तू नसशील तरी

तू नसशील तरी

1 min
366

तू नसशील तरी

भाव असतील रेशमांचे

मंद वा-यावरी झुलतील

 सुगंध माझ्या भावनांचे...........

   तू नसशील तरी

  तुझ्या असण्याचा आभास

  तुझ्याच जाणिवेच्या अंतरी

  साठला माझा ठाम विश्वास.......

तू नसशील तरी

माझ्या अस्तित्वाचा तूच आरसा

माझ्या शिवाय कुणालाही 

जाणवणार नाही फारसा...........

   तू नसशील तरी

   सूरांविणा बासरीस काय अर्थ

   श्रोता तत्पर ऐकण्यास जरी

   तरी भासे सगळेच व्यर्थ.........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance