STORYMIRROR

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

4  

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

तू माझी का त्याची ?

तू माझी का त्याची ?

1 min
533

कित्येक रात्री मी काढल्या जागूनी

मनास माझ्या सतवत राहतो एकच प्रश्न?

पावसात भिजताना प्रिये तू

पुरेपुर होऊन जातेस त्याची

मग सांग ना ग मला प्रिये

तु......माझी ...? का... त्याची...?


कधी कधी मज असे का वाटते.....?

माझ्यापेक्षा प्रेम तू करतेस पावसावरती

मग सांग ना ग मला खरे प्रेम तु करतेस कोणावरती..?

माझ्यापेक्षा तु वाट पाहत असतेस त्याची

चाहूल त्याची लागताच तु हुरळून जातेसच कशी..?

मनास माझ्या मग सतवत

राहतो एकच प्रश्न

तु...माझी..? का ..त्याची.......?


जेव्हा लागतो पाऊस अन्

सुटतो सुसाट वारा

सोडूनी माझा हात प्रिये मग

झेलतेस तू अंगावरती पाऊस धारा..

माझ्या प्रेमापेक्षा पावसाची सरच

तुला जास्त भिजवत असते

आजुबाजुच्या परिस्थितीचे

तुला भानच राहिलेले नसते

तेव्हा मनास माझ्या

सतवत राहतो एकच प्रश्न..?

तु माझी,,,? का त्याची...?


 तुझे अंग नी अंग जाते

जेव्हा भिजूनी पावसात

तेव्हा तुझ्या रुपात प्रिये

भिजतो सारा आसमंत

तेव्हा राणी होऊन जातेस तु पुरेपुर त्याची

मनास माझ्या सतवत

राहतो एकच प्रश्न ...?

तु माझी ...., ? का ..,..त्याची.....?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance