तू लावण्यवती
तू लावण्यवती
तू लावण्यवती सुंदर
सुंदर तुझी अदा गं
लावलेस प्रेमाचे अत्तर
मी झालो आता फिदा गं
मी सावळा गं कान्हा
तू अप्सरेचं रूप गं
कसं हे प्रेम करावं
असं तुझ्यावर खूप गं
मुखडा लालबुंद तुझा
दे चाखण्या एकदा गं
मी आहे चाकर तुझा
तुझी सेवा करेल सदा गं
लाख येऊन गेले सखे
तुझ्यातून दूर करण्या गं
देव सारं पाहतो आहे
पाप लावीन भरण्या गं
कानात झुबके तुझे
देतात सुंदर शोभा गं
ये जवळ ये आता तू
तुला देतो सारी मुभा गं
तू माझी गानकोकिळा
मी तुझा सुगंधित गजरा गं
सांग का वेळ घेतेस एवढा
कवेत घे पाऊस होऊन भिजरा गं

