STORYMIRROR

Priya Bhambure

Romance

4  

Priya Bhambure

Romance

तू जीवनात आलं आणि असं वाटलं ....

तू जीवनात आलं आणि असं वाटलं ....

1 min
401

तू जीवनात आलं आणि तेव्हा वाटलंजीवन सगळं बदललं

तुझ्या आगमनात जरा जास्तच बहरलं तुला पाहिल्यावर वाटलं

क्षणभर माझं हृदय हरवलं पुढच्याच क्षणी मला ते तुझ्या मनात दिसलं

तुझ्या येण्याने वाटलं एक स्वप्न पूर्णत्वाला आलं

लाड पुरवायला हक्काचं कुणीतरी मिळालं

तुझ्या आगमनाने सुरु झाला सोहळा नवीन आयुष्याचा

साजरा होईल प्रत्येक दिस तुझ्या माझ्या नात्याचा

तुझ्या येण्याने सजीवता मिळाली एका मूर्तीला

फुलाप्रमाणे नातसुद्धा लागल बहरायला

तू जीवनात आल्यावर वाटलं अनेक जन्मच प्रेम माझ्या नशिबी आलं

तुझ्या रूपात ते माझ्यापर्यंत पोहचलं

तुझ्या येण्याने ह्या उचकीशी एक नवीन नातं जुळलं

तूच आठवण काढत असशील म्हणून भेटण्यास मन तेव्हा तेव्हा आतुर झालं

तुझ्या सहवासात जाणवलंसगळं आहे जगात

एक हक्काचं घर मिळालं मला तुझ्या मनात

मला वाटलं तुझ्या रूपाने एक तारा माझा झाला

कारण,माझी कविता ऐकून तो बघ किती प्रेमाने गालात लाजला

तुझ्या येण्याने वाटलं म्हतारपण देखील सुखात जाईल

काठीची गरज कशाला ?जेव्हा तुझी सोबत राहील

तू आल्याने वाटलं सर्व क्षण मी जगले आता श्वासाने थांबु का?म्हटलं तरी आनंदाने " हो " म्हटले

तू जीवनात आल्याने माझ्या डोळ्यातील अश्रूंची जागा संपली

कारण, तुझ्या हर्षेची कळी माझ्या आयुष्यात उमलली

तू जीवनात आला तेव्हा निसर्गापासून ते पशु- पक्षांपर्यंत सर्वानी तुझे निवासस्थानं विचारले

तेव्हा अभिमानाने मी प्रत्येकाला बोट माझ्या हृदयाकडे दाखविले

म्हणूनच ; माझ्या प्रिया , आज एकाच सांगणे तुला,

" मरण जरी आलं तरी ते ऐटीत असावं

फक्त इच्छा एवढीच मी तुझ्या मिठीत रहावं " ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance