तू आणि पाऊस
तू आणि पाऊस
पाना फुलांवर, झाड़ा वेलींवर टपटप पडतो पाऊस
तुझ्यासारखाच वेड्यासारखं खुदकन हसतो पाऊस...
तापलेल्या जमिनीवर हलकेच बरसतो
तहानलेल्या धरणीला तृप्त करुन जातो
कधी धो धो रस्त्यावर कोसळतो,
तर कधी माझ्यासारखा एकांतात भटकतो
मी मूक होऊन अश्रू ढाळतो,
तो ही असाच, कोणाच्या आठवणीत बरसतो?
मी आठवतो ओला स्पर्श तुझा, कधी काळचा,
त्यालाही माहित असेल का, अर्थ प्रेमाचा?
कवितेत माझ्या मी त्याला, बांधून पाहतो शब्दाने,
पण त्याचेही तुझ्यासारखे, लाखो बहाणे
शोधतो मी पावसातही माझ्या स्वत:ला,
तू आणि पाऊस, शेवटी एकसारखेच, समजावतो मनाला!!!

