STORYMIRROR

Pratibha Vibhute

Classics

4  

Pratibha Vibhute

Classics

तुळशीचे लग्न

तुळशीचे लग्न

1 min
455

कार्तिक शुद्ध द्वितीयेला

रम्य सुंदर असे सोहळा 

वृंदावन केले सुशोभित

भक्तीचा फुलतो मळा...१!


अंगणात घातला सडा

रांगोळीत भरू या रंग

घरदार ,माणसे सजले

तुळशी लग्नात सारे दंग...२!


उसाचा मांडव दारात

आरोग्यदायी तुळस बाई

वाती लावू आवळ्यावर

वृंदाच्या लग्नाची घाई ...३!


वाजंत्री,ढोल होई गजर

मधोमध धरती अंतरपाट

मंगलाष्टका म्हणती भटजी

तुळशी हरी लग्नाचा थाट...४!


वृंदा ल्याली हिरवा शालू

शेषशायी विष्णू शोभती

अक्षता पडता अंगावरी

मान मिळे सौभाग्यवती...५!

 

काळाच्या ओघात लुप्त 

तुळशी विवाह शहरात

गावात मात्र अजून ही

चालती सर्व परंपरा,रीत...६!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics