STORYMIRROR

PRAMILA SARANKAR

Romance

3  

PRAMILA SARANKAR

Romance

तुला जपणार आहे.....

तुला जपणार आहे.....

1 min
321

*तुला जपणार आहे....*


तू माझ्या अंतरीचे शब्द आहेस, 

तू माझ्या कवितेची प्रेरणा आहेस, 

तू माझ्या जगण्याचा श्वास आहेस, 

तू माझ्यातल्या पवित्रतेची आस आहेस... 

दिलेल्या वचनाला मी अखेरपर्यंत जागणार आहे, 

तुला सारी जिंदगी 

हृदयात मी जपणार आहे....


तुला पाहून जगण्याची आस मनी भरते, 

तुला पाहून ह्रदयाची तार ही छेडते, 

तुझ्या सोबतच्या क्षणांनी धुंद मी होते, 

सहवासाने तुझ्या पावसात चिंब चिंब मी न्हाहते.... 

पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती मी करणार आहे, 

तुला सारी जिंदगी ह्रदयात मी जपणार आहे...


तुला पाहून अबोल बोल ही बोलके होतात, 

हळूवार गाठी मनीच्या खोलतात, 

उजळून येतात दाही दिशा, 

माझ्या कवितांची तूच प्रेरणा आणि आशा...

तुझ्यासवे उत्तुंगतेची भरारी मी घेणार आहे, 

तुला सारी जिंदगी हृदयात मी जपणार आहे.... 


तुझ्या आवाजातील कियमयेला सर्वोत्तम शिखरावर मला पाहायचं आहे, 

सुंदर अशा तुझ्या स्वप्नाची पूर्तता करणारा एक अनामिक कण मला व्हायचं आहे, 

तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्याचा अनमोल क्षण मला बनायचं आहे, 

तुला सारी जिंदगी मला असचं फुलासारखं जपायचं आहे.....


तुला आठवून आठवून मनोमनी मी खुलणार आहे, 

तुझ्या आठवांचे अत्तर ह्रदयाच्या कुपीत जपणार आहे.... 

तुझ्या सोबतच्या क्षणा क्षणांनी मी हसणार आहे, 

तुझ्या बरोबर बागडताना मी फुलणार आहे,

तुझ्या आठवणी मोरपीसागत साठवणार आहे,

तुला माझ्या ओंजळीत फुलपाखरासारखं जपणार आहे....


तुझ्या माझ्यातील ऋणानुबंधाचे बंध आणखी घट्ट करायचे आहेत,

रंग प्रेमाचे त्यात देहभान विसरून बरसवायचे आहेत, 

तुझा हात हातात धरुन आयुष्याची मजा लुटायची आहे, 

तुझ्यासवे स्वच्छंदी पाखराप्रमाणे बागडायचे आहे....

वेड्यासारखं या अनुभूतीत मला राहायचं आहे,

तुला सारी जिंदगी मला असंच माझ्यात जपायचं आहे....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance