तुझ्यासोबत
तुझ्यासोबत
सोबत तू असताना
मनातले गाता यावं
अनोळख्या जागीही कधी
विसाव्याला थांबता यावं
तुझ्यासंगती मला
प्रेमिका होवून जगता यावं
तुझ्या नेत्रातल्या स्वप्नावर
मला रानी होवून झुलता यावं
तूझ्यातल्या चिमुकल्याचे
आभाळ मला पेलता यावं
संस्कार देवून योग्य त्यांना
यशाचे श्रेय घेता यावं
तुझ्या संगती मला
संसार काव्य लिहिता यावं
तूझ्या व चिमुकल्यासाठी
मला दीप होवून जळता यावं

