STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Romance Others

3  

Ramkrishna Nagargoje

Romance Others

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी

1 min
345

तुझ्यासाठी तीळ खूप आणले, 

गूळ घालून मळव थोडे थोडे,

तीळ गुळाने बोटं तुझे माखले, 

चाटुदे मला एक त्यातल्ये. 


तुझ्यासाठी पैठणी मोलाची, 

तुझ्यापेक्षा क्षुल्लक किंमतीची. 

तुझ्यासाठी सोन्याची एक सरी, 

तुझ्यासारखी, नसे ती परी. 


तुझ्यासाठी पैंजण पहा शुभ्र किती, 

मनापासून तुझ्या थोडी फिकी फिकी.

तुझ्यासाठी हर्ष आणावा किती, 

आनंदाची तू खरी मूर्ती.


तुझ्यासाठी बंगले बांधावे किती, 

तुझ्याविण सदन रिकामे किती, 

तुला काय द्यावे, काय विचारावे, 

काही नको मजला,

तिळगुळ द्या थोडे. 


तुझ्यासवे काळ गेला किती, 

कुठे तो थांबला,झाले वर्षे किती, 

थांब थोडे तिळगुळ घालतो मुखी. 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance