तुझ्या-माझ्या सवे...
तुझ्या-माझ्या सवे...


नवा खेळ मांडू पाहतोय ,
नवी भातुकली रांधू पाहतोय,
नवं नातं जोडू पाहतोय,
तुझ्या माझ्या सवे...
स्पर्श तोच, अर्थ नवा,
वीणा तीच, सूर नवा,
तोच शिंपला, मोती नवा,
तुझ्या माझ्या सवे...
तेच पाऊल, वाट नवी,
तेच मन, हुरहूर नवी,
वारा तोच, गीते नवी,
तुझ्या माझ्या सवे...
हात तुझे हातात असावे,
स्पर्शानीच हितगुज करावे,
n> मुक्यानेच सारे समजावे, तुझ्या माझ्या सवे... कसले कसले बंध नसावे, पुष्पासम नाते बहरावे... हात तुझे रे गळ्यात माझ्या, जणू मंगळसूत्र बनावे आणखीन दागिने कशाला ? लग्नसोहळा बंध कशाला ? अंतरातल्या प्रेमालाही, नात्यासाठी नाव कशाला ? विश्वासांचे हार करावे, सुखाच्या अक्षतांत नहावे, अंतरात अनुबंध जपावे, तुझ्या माझ्या सवे...