स्पर्श तुझा...!
स्पर्श तुझा...!


तुझ्या पाऊल-स्पर्शानं, कुंद माती मोहरली...!
तुझ्या देखण्या दृष्टीनं, शुभ्र जाई गंधाळली...!
तुझ्या आवाजानं ल्याला, स्वरसाज संगीताला...!
तुझ्या हुंगण्यानं जणू, अर्थ गंधाला मिळाला...!
तुझ्या बहरण्यानेच, तारुण्य पानोपानी लाजे...!
तुझी झुळूक घेऊन, वारा आनंदानं गुंजे...!
तुझ्या सोवळ्या मनाला, शांतीचं घरकुल...!
तुझ्या तुळस-रोपाला जणू, अबोलीची फुलं.....!