तूच असतेस
तूच असतेस


पावसाची मंद बरसात तशी धुंद साथ तुझी...
हिरव्यागार पानावरति जडवलेली नक्षी तुझी...
तूच उन, तूच पाऊस, सार काही तूच असतेस...
वसंत ऋतूत इवल्या रोपाचा, शांत जन्मही तूच असतेस...!
रात्रीचा दयाळू अंधार, अन् चांदण्यांची शाल तू असतेस...
सांजवेळी तुळशीपुढला, 'नंदादीप' तू असतेस...!
बागडणा-या फुलपाखराचा इवला पंख तू असतेस...
रांगोळीच्या कणावरचा रुपेरी रंग तू असतेस....!
संध्याकाळचा शांत वारा, आकाशातला सुखी तारा...
तुझ्यांतला माझा चेहराही, फक्त फ़क्त तूच असतेस....!