अजूनही ...
अजूनही ...


अजूनही तोच आठव ढगांमधे,
आभाळ कितीही बदलले तरी..
अजूनही तीच हुरहूर गंधामधे,
सुवास कितीही बदलला तरी...
अजूनही तेच सृजन सृष्टीमधे,
रंग कितीही बदलले तरी...
अजूनही तेच चैतन्य थेंबांमधे,
पाऊस कितीही बदलला तरी...
अजूनही तोच आर्जव कोकीळेमधे,
सूर कितीही बदलला तरी...
अजूनही तीच ओढ ह्रदयामधे,
श्रावण कितीही बदलला तरी...