केवळ तू...
केवळ तू...


चाहूल मला रात्रभर, तुझ्या धुंद स्वप्नांची..
ऐकू येई हाक कुठूनशी, तुझ्या शांत श्वासांची.. धुंद लेखणी, पैंजण गाते, तुझा सूर घेऊन... शांत सागरी लाट बिलोरी, बिंब तुझे त्यातून.. निळसर छाया, मेघ गुलाबी, त्यात केवडा धुंद.. साथ तुझीही तशी मोहरे, वाऱ्यासवे या मंद... शब्द तुझाही आत रूणझुणे, जगणे होते गाणे... टिपूरश्या या चांदण्यातही, तुझे सुरेल बहाणे...
पत्रात तुझ्या, शब्दाहूनही निःशब्दच बोलते...
दोन शब्दातील अंतर अवघे, तुझ्यात विरघळून जाते...!