STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Romance

3  

Kalpana Nimbokar

Romance

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी

1 min
508

तुझ्या आठवणी मागतात मला

गडबडीतले उसणे क्षण

तू माझ्या जवळ असतांनाचे

होत असलेले भास आणि भ्रम....

एकांताच्या काठावर

उसळतात तुझ्या आठवणी

व्याकुळ आणि फक्त व्याकूळच

करतात तुझ्या आठवणी.....


तुझ्या आठवणी येतात

मनाच्या अंगणात हसतात बहरतात

मला झूलवतात मनाला तरसवतात

फूलवून अंर्तबाहय मला

घेवून जातात माळरानी

जिथे असतो आपण

भेटलेलो कधी काळी....

मनाला जाळतात तुझ्या आठवणी


गाभार्‍यात जीवनाच्या

फीरतात तूझ्या आठवणी

वेध आयुष्याचा माझ्या

घेतात तुझ्या आठवणी

क्षणोक्षणी जळी स्थळी

छळतात तुझ्या आठवणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance