STORYMIRROR

Rohit Dhage

Inspirational

4  

Rohit Dhage

Inspirational

तुझं माझं स्वप्न..

तुझं माझं स्वप्न..

1 min
29K


मनमोहक क्षणांना स्वप्नातीत साठवत नेणारं,

अतिशय निर्मळ असं काही...

मनाच्या देव्हाऱ्यात जपलेलं

तुझं माझं स्वप्न..


टपोऱ्या डोळ्यात दाटलेलं,

कसलीशी शपथ मागणारं..

आणि हातात हात घेऊन डोळ्यात हसलेलं,

स्वप्न.. तुझं माझं


तुझं हसणं, अन मोत्यांच्या माळेचं बरसणं..

गालावरची खळी,

अन ओठांवर फुललेली नाजुकशी लाल कळी..

आणि इथेच राहून जावं आता मग,

तुझ्या शुभ्र छायेखाली..


केसांच्या गाभाऱ्यात ऊर भरत राहावं,

आणि आयुष्य सरून जावं..

जणू मिटल्या पापण्यात भर दुपारी स्वप्न पडून जावं..

एक सुंदर स्वप्न...

तुझं माझं भेटणं इतकं सहज असावं..

इतकं सुंदर असावं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational