STORYMIRROR

Rohit Dhage

Inspirational

3  

Rohit Dhage

Inspirational

समुद्र..

समुद्र..

1 min
29.8K


माझ्या डोळ्यात उसळणाऱ्या,

तुला पाहून झेप घेणाऱ्या लाटा

पाषाणरूपी हृदयावर जाऊन कोसळणाऱ्या,

फक्त फेसाळणाऱ्या लाटा

हजार वेळा आपटणाऱ्या,

क्षणाक्षणाला फसलेल्या लाटा..


आवाज.. फक्त आवाज काही होत नाही

पाणी मात्र खळखळत राहतं..

आतल्या आत जिरत राहतं..

आनंदलेल्या जमिनीवरचं खारं पाणी..

काहूर आणतं माझ्या असण्यावरच..


माझा फक्त प्रयत्नच असतो दर वेळी,

ओली जमीन वाचवण्याचा.. जमेल तेवढी.. जमेल तशी

आणि मग उगाचच होते.. दरवेळची वेडगळ.. दरवेळची

दर वेळी हे असंच होतं.. जेव्हा तुझं दिसणं होतं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational