तुझं असणं तुझं नसणं..
तुझं असणं तुझं नसणं..
तुझं असणं तुझं नसणं
माझं जगणं माझं मरणं असतं
माझा श्वास माझं गुदमरणं असतं
तुझं असण पुनवेचा चंद्र असतं
नसणं अमावस्येची रात्र असतं
असणं गालावरची खळी असतं
नसणं भयाण पोकळी असतं
तुझं असणं मुदतीची ठेव असतं
तुझं नसणं ठेवीवरील व्याज असतं.