तुझं आभासी वास्तव्य
तुझं आभासी वास्तव्य
तुझं आभासी वास्तव्य
सतत जाणवतं
जवळ तू नसतानाही
ते नेहमी सोबत असतं
तुझं आभासी वास्तव्य
उठता बसता मला दिसतं
मला माझ्यापासूनच
दूर ते लोटतं
तुझं आभासी वास्तव्य
मला गर्दीत एकटं करतं
तर कधी एकांतात
आठवणींची गर्दी करून बसतं
तुझं आभासी वास्तव्य
कधी आनंददायी ठरतं
तर कधी हळूहळू
जीवाला कासावीस करणार भासतं...

