तुझी माझी प्रीत!
तुझी माझी प्रीत!
गुण दोष असो...
कितीही माझ्यात,
ढाल मी असेन
तुझ्या संकटात !
निशब्द हे मन...
नयन बोलके,
वाच ना एकदा
ह्रदयाचे ठोके !
आगळी वेगळी...
तुझी माझी प्रीत,
वेडे जग सारे
कळेना ही रीत !
मतभेद लाखो...
तुझ्यात माझ्यात,
प्रेम सामावले
विरूद्ध टोकात !
जीवन संगीत....
सुरेल आपुले,
नाते हे अनोखे
देवाने विणले !