तुझी डायरी
तुझी डायरी
तू निघून गेल्यावर प्रिया
तुझी डायरी चाळत होते
तुला त्यात शोधत होते
पण त्यात वसले मीच होते
किती प्रेम तुझे माझ्यावर
ते सारे पान सांगत होते
पहिल्या भेटीचे ते सुंदर क्षण
आणि शेवटचे आपले भांडण
मी एक एक पान पलटवत होते
तुझ्या भावना समजत होते
पण झाले आता उशीर होते
तू देह तुझे सोडले होते
ज्या व्यक्तीवर तू प्रेम केले
त्याने तुला ओळखले नव्हते
मी माझे सुंदर क्षण गमावले होते
डोळ्यात आठवणी चे अश्रू होते
मिठीत तुला घ्यायचे होते
माफी मला मागायची होते
नाही करणार तुझाशी वाद
चुंबन तुझे घ्यायचे होते

