तुझी आठवण
तुझी आठवण
काही नाही माझ्याजवळ
आहे फक्त तुझी आठवण
गर्दीतही एकटे करते मला
फक्त तुझी आठवण
एकटे असताना मनात गर्दी करते
फक्त तुझी आठवण
हसता हसता डोळयात पाणी आणते
फक्त तुझी आठवण
रडताना ओठांवर हसू आणते
फक्त तुझी आठवण
सारे काही हिरावले तरी
मला श्रीमंत करते तुझी आठवण

