तुझेच नाव असते सदा माझ्या ओठी
तुझेच नाव असते सदा माझ्या ओठी
सख्या रे, आठवण तुझी काढते रे रात्रंदिवस
तुझेच नाव असते ओठी सदा माझ्या मनी
गुंतले मी तुझ्यात
सर्वत्र तुझाच भास होई
तुझी आठवण सदा मला येई
तुझेच नाव असते सदा माझ्या मनी
केला तुला इशारा
पता लागला का तुला
हातात हात घेऊनी
गाऊ या प्रेमाची गाणी
तुझेच नाव असते सदा माझ्या मनी

