तुझे लाजणे
तुझे लाजणे
तुझे लाजणे,
मला चोरून पाहणे,
हळूच गालात खुदकन हसणे
हसतांना गालावरची खळी
खुलवते पाहणाऱ्याची कळी
तुझे मौनात राहणे
मम मनाला भुलवते
अंतरातल्या प्रेमाला हलवते
कळत नाही तुझ्या मनात काय?
मनात भीतीला फुटतात पाय
जीव माझा घुटमळतो
तुझ्या भोवती गोल गोल फिरतो
मात्र तुझे पाणीदार डोळे
फेकताच प्रेमाचा कटाक्ष
काळजात कालवाकालव
घायाळ काळीज माझे
साजणी एवढेच कर माझ्यासाठी
ये अशी कुशीत माझ्या,
अन् तो दिवा मालव
सखे गं, दिवा मालव
दिवा मालव

