तुझा प्रियकर
तुझा प्रियकर
मस्त पावसात अशा
मिठीत ये ना तू प्रिये
गरमा गरम भाजलेला
मका खातो तुझ्या ओठाने सखे
लाजू नकोस ग आता
विळखा पडता सिंहकटी
टपोरे नेत्र खोल ना
आपल्या मिलनाची हीच घटी
तुज आवडतो म्हणून
प्रिया आणला मी कणीस
लावले त्यावर लिंबू मीठ
नको पाडू त्याचा असा खिस
गारव्याने अंगावरी शहारा
अधरातील गोडी चाखू
मदमस्त काया चेतवी देह
कुठवर ग धीर मी राखू
तू माझीच नी मी तुझा
नाही कोणतीच आता बाधा
तुझ्या प्रेमात झालो बेधुंद
तुझा प्रियकर आहे साधा

