तिने काय निर्णय घेतला होता..?
तिने काय निर्णय घेतला होता..?
काल निशिगंध बहरला होता
सहस्त्र अश्या फुलांनी
मंद मंद दरवळत होता
जणू काही तिचीच वाट पाहत होता...
आकाशात अधून मधून
तारकाही लुकलुकत होत्या
ती आज येणार... की नाही??
नुसतीच हूरहूर वाढवीत होत्या...
निळ्या शांत त्या किनारी
एका खडकावर , पाण्यात पाय टाकून
बसलो होतो
ती मागे उभी असताना
पाण्यात प्रतिबिंब दिसेल
याचीच वाट बघत होतो...
मात्र...
काल ती आलीच नाही
तिच्या न येण्याने मन हे हिरमुसलं होतं
निशिगंध ही सुकला होता, आणि
पहाटेपर्यंत तारकाही निजून गेल्या होत्या
कुणास ठाऊक... तिने काय निर्णय घेतला होता..??

