STORYMIRROR

Pratibha Bilgi

Romance

3  

Pratibha Bilgi

Romance

प्रेमाची परिभाषा

प्रेमाची परिभाषा

1 min
138

प्रेमाची परिभाषा ती काय असते

कधी चंचल उनाड वारा

तर कधी मोकळे रान असते


मनाने एकमेकांची केलेली सोबत असते

कधी शांत सागर किनारा

तर कधी उफाळणारी नदी असते


दोघांचे मौन इथे संवाद असते

कधी चुकणारा ठोका हृदयाचा

तर कधी पापण्यांची उघडझाप असते


हळुवार स्पर्शाची जणू झालर असते

कधी प्रवास हा काट्याकुट्यांचा

तर कधी मुलायम पायवाट असते


आंबटगोड अनुभवांची ही शिदोरी असते

कधी मंतरलेली पहाट जादुई

तर कधी निराशाग्रस्त संध्याकाळ असते


नाते जगावेगळे जे प्रेम असते

कधी नाजूक बंध रेशमी

तर कधी जकडणारा पाश असते



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance