STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

3  

Shabd Gandh

Romance Others

मी पाहीन

मी पाहीन

1 min
181

तु लिही कविता

मी पाहीन तुला

कविता लिहिताना

जणू समुद्रा वर कोसळतोय

धुवांधार पाऊस

आणि आपण बसलोय

कागदाच्या नावेत

काळ विरघळून जाईल

आपण समुदात असो की नावेत....


जो काळ साक्षी असतो

श्वासांचा

तो इतिहास असतो प्रेमाचा

मी पाहीन एक इतिहास अस्पर्श

तु साकार कर त्याला

तु लिही कविता

आणि मी पाहीन तुला

धुवांधार पावसा सारखं जगताना...

प्रवासातील आपण दोघे

पार करू तो समुद्र

तु सोबत असताना नाही

मला वाटतं भीती

आली किती भरती-ओहोटी...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance