STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Romance

3  

Mrs. Mangla Borkar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
145


फक्त तू नकोस मला साथही तुझी हवी आहे

शांत स्थळी एकांतवेळी प्रीत तुझी हवी आहे

शृंगार प्रेम नको मला वात्सल्य प्रेम हव आहे

सांजवेळी सूर्यास्ताला प्रेमगीत हव आहे


दवबिंदू नकोत मला रिमझिम पाऊस हवा आहे

रानफुलाला सुखावणारा गार वारा हवा आहे

फक्त शब्द नकोत मला अर्थ त्यातला हवा आहे

तिमिरातून तेजाकडचा मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला द्रुष्टी तुझी हवी आहे


तुझ्या डोळ्यात दिसणारा विश्वास मला हवा आहे

तुझा दुरावा नको मला सहवास तुझा हवा आहे

खचनाऱ्या माझ्या मनाला आधार तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला प्रत्येक क्षणी तू हवा आहेस

वेळ तुझी नको मला वेळीस तू हवा आहेस.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance