तुझ काळीज
तुझ काळीज
वसंताच्या उष्ण लहरीत
श्रावणातील धारेसारखा दिसला
फुलांचे गालीचे सारुन बाजुला
काळजात तो घर करुन बसला
माझ्या काळजाची प्रित
तुझ्या काळजात बसेल का
जीव वेडावतो तुझ्यासाठी
माझ वेड मन तुला दिसेल का
तुझ्या आठवणींतील चंद्र तारे
खुणावतात मला बसुन
काळीज जेव्हा एकांतात रडते
तेव्हा तेच जातात मला हसुन
मला पाहुन करतेस नजरअंदाज
माझा अंदाज हा खरा असावा
दुरुन करतेस नजरेने इशारे
तुझ्या काळजाचा मी हिरा असावा