STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

3  

Shabd Gandh

Romance Others

शब्दांची मिठी

शब्दांची मिठी

1 min
204

कधी तरी रुसून ही पहावं...

कसं समजतं कुणी आपल्याला

 हे ही जरा बघावं.


नाही भेटलो शब्दात.. तर जी होते तळमळ आपली,

त्यांचेही होते का असे, आपण ही पहावे.


रोज नवा दिवस, रोज नवी ओळख,

त्यांना ही भेटत असेल नवी नवी झलक.


संपलेल्या दिवसा नंतर, 

आपली ओढ कोणाला किती,

जेव्हा थकलेले ते बोलतील, 

आता बास...एक हवी शब्दांची मिठी.


मन शांत करणारी ती,

अपल्यातली ती शब्दांची मिठी.


रुसव्या नंतर ती होणारी एकमेकांची भेट,

मग ती असली जरी शब्दांची गळा भेट.


संपवण्या दुरावा ,

सुरू जो केलेला रुस्व्यानी.


हवीच असते एक शब्दांची मिठी

हवीच असते एक शब्दांची मिठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance