ती सध्या काय करते?
ती सध्या काय करते?
ती सध्या काय करते?
वृद्धाश्रमात बसून मुलगा आपल्याला वापस घरी घेऊन जायला येईल याची वाट पाहते.
ती सध्या काय करते?
वृद्धाश्रमा पासून जाणाऱ्या प्रत्येक
शाळकरी मुलात आपला नातू असाच
मोठा झाला असेल याचे स्वप्न पाहते....
ती सध्या काय करते?
दररोज सकाळी देवापुढे मुलाला सुखी ठेव हीच प्रार्थना करते.
ती सध्या काय करते?
सणाच्या दिवशी दिवसभर रडत बसून घरी जाण्याचे स्वप्न पाहते.
ती सध्या काय करते?
प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र मुलासाठी जगते.
ती सध्या काय करते?
आपल्या मुलाच्या मांडीवर शेवटचा श्वास हेच मागंण मागते.
ती सध्या काय करते?
ती फक्त माझा मुलगा,माझा बाळ,माझा राजा,माझा सोन्या म्हणून शेवटचा श्वास घेते.
