स्त्री हक्क
स्त्री हक्क
1 min
551
२१ व्या शतकात जगतांना
मिळव तुझा स्त्री हक्क
घाबरू नकोस तू कारण,
लक्षात ठेव तू आहे स्त्री चक्क
लक्षात ठेव तू स्त्री
तूच आहे तारिणी
विश्वभर परिक्रमा करणारी
तूच आहेस रणरागिणी
आता माग तुझा हक्क
चूलमूलाच्या पुढ चाल हक्कान
ठेव तू स्वतः वर विश्वाश
आता उठ चल लढ हक्कान
आहेत तुझ्याजवळ आज
स्त्री बरेच हक्क अधिकार
ओळख तुझ्या स्वतःचे
हक्काके स्वयंअधिकार
घर करिअर संभाळून
करते तारेवरची कसरत
कर तू आता हक्कासाठी
तुझे प्रयत्न अविरत
