भाषा प्रेमाची
भाषा प्रेमाची
1 min
380
तुझपाशी रे मानवा
काय आहे रे देण्यास!
आहे एकच प्रेमाची
भाषा फक्त बोलण्यास ।।१।।
भाषा प्रेमाची नाजुक
नित्य असो मुखावर
सरस्वती वास करी
निरंतर जिव्हेवर ।।२।।
नको वापरू रागीट
शब्द कधी तू मानवा
मुखावर ठेव थोडा
अविरत तू गोडवा ।।३।।
मृदु भाषाच प्रेमाची
जीवनात घ्या बोलून
नाही तर कोण काय
जाते शेवटी घेऊन? ।।४।।
