मोल देण्याचे
मोल देण्याचे
1 min
326
हे मायबापा!!
धन्य तुझे आम्हावरी उपकार
आज जाणले मला
तुमचे अनमोल उपकार जीवन देण्याचे!!
हे मायबापा!
आम्हा दिले तुम्ही जीवन
दोन क्षण कुशीत येता
मिळतो आम्हा सहारा
हे मायबापा !
थोर तुमचे मन कन्यादान करण्याचे
देऊन स्वतः च्या काळजाचा तुकडा दान
नव जीवन देता आम्हा लेकीस
आनंदान
कन्यादान असे मोठे दान
तुम्ही देऊन केले जीवन साकार
हे मायबापा!
मोल तुमचे दान देण्याचे
पांग फेडती जीवनाचे
हे मायबापा!
अफाट तुमची आम्हावरी माया
कसे फेडू तुमचे हे मोल देण्याचे
हे मायबापा!
धन्य तुमचे हे दान !
प्रणाम तुम्हा माझे मोलाचे!!