ती अशीच आहे
ती अशीच आहे
ती अशीच आहे
थोडी मायाळू
थोडी तिखट
थोडी लाजाळू...
तीचा पसारा
सदैव घरभर
विखुरलेला
तिच्या पैंजणाचा
छुमछुम नाद
घरभर पसरलेला...
तिची माया
तिचा हट्टीपणा
तिचा लडिवाळ
तिचा धीटपणा...
तीची मायाळू मिठी
तीचा गोड आवाज
तिचा नटणंमुरडणं
तीचा तो वेगळाच साज
तीचा बाबा बाबा चा नाद
ती तो बडबडीचा संवाद
ती जेंव्हा सासारी जाते
आठवतो तिचा संवाद...
ती अशीच आहे
अवखळ...
निर्झर....
