तिचे सौंदर्य
तिचे सौंदर्य
तिचे सौंदर्य म्हणजे काय तर....
साधीसुधी गृहिणीत अपलेपणाचे सौंदर्य असते
तिच्या वागण्या बोलण्यात स्वभावात
आत्मविश्वासाचे सौंदर्य भरभरून दिसते
घर संभाळून घेणाऱ्या गृहिणीत
सभ्यतेचे सौंदर्य खुलून असते
कुंटुबाला घडवणाऱ्या गृहिणीत
कर्तव्यदक्षतेचे सौंदय फुलून दिसते
चांगले संस्कार देवून
माणुसकीचा माणूस साकारणाऱ्या गृहिणीत
मातृत्वाचे सौंदर्य बहरून असते
चारचोघात वावरताना
स्वतःला जपणाऱ्या गृहिणीत
कर्तृत्वाचे सौंदर्य लखलखुन दिसते
राबराब राबून कुटुंबाला आधार देणाऱ्या गृहिणीत
कर्तव्याचे सौंदर्य उजळून दिसते
वेदणा यातना सुखदुःखात
साथ देणाऱ्या गृहिणीत
नम्रतेचे सौंदर्य देदीप्य असते
परिवाराशी एकनिष्ठ प्रामाणिक राहणाऱ्या गृहिणीत
सहनशीलतेचे सौंदर्य
नसंपणारे असते
आहेत्यात सुख जाणणाऱ्या गृहिणीत
समाधानाचे सौंदर्य भरपूर दिसते
काळीसावळी गृहिणीत सुध्दा
जिद्दी मेहनतीचे सौंदर्य असते
धुणेभांडे मोलमजुरी करणारी शेतात राबणाऱ्या गृहिणीत
तिच्या कष्टाचे सौंदर्य दिसते
अन्याय अत्याचाराच्या विरोधात
लढणाऱ्या गृहिणीत
रूद्रावताराचे सौंदर्य संचारलेले असते
प्रगतीच्या वाटेवरून
गरूड भरारी घेणाऱ्या गृहिणीत
समृद्धीचे सौंदर्य अवतरलेले दिसते
स्त्री म्हणजे नुसते सौंदर्याच नाही तर ती
नवचंडीकाही असते
आभाळाला खाली खेचुन आणण्याचे सार्मथ्यही तिच्यात दिसते
तेव्हा....
दृष्टीकोन आणि बघण्यात
सकारात्मकता असली की
वाईट काहीच दिसतं नाही
हेतू चांगला असला की
तिचे सौंदर्य चोरूनलपून
बघण्याची गरज भासत नाही

